माझ्याकडचे कर्जाऊ पैसे परत घ्या – विजय माल्या

0

लंडन :  भारतातील बँकांना 9 हजार कोटींना चुना लावून लंडनला पळालेला उद्योगपती विजय मल्ल्याने कर्जाच्या मुद्दलाची परतफेड करण्याची तयारी दर्शविली आहे. कर्जाचे 100 टक्के मुद्दल मी देतो. कृपया ते स्वीकारा अशी विनंती मल्ल्याने बँकांना केली आहे. कर्जावरील व्याजाच्या परतफेडीबाबत मात्र त्याने काही स्पष्ट केलेले नाही.

विविध बँकांचे नऊ हजार कोटी रुपये थकवून ब्रिटनमध्ये पसार झालेला उद्योगपती विजय माल्या याने बुधवारी ट्विट करून थकीत कर्जातील मुद्दल परत करण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर अगुस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर करारातील मध्यस्थ ख्रिस्टियान मिशेल याचे प्रत्यार्पण झाल्याने माल्याने प्रत्यार्पणाला घाबरून कर्ज फेडण्याची तयारी दर्शवल्याची चर्चा सुरू झाली होती. विजय माल्याच्या प्रत्यार्पणाबाबत ब्रिटनमधील न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तसेच बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवून पसार झालेल्या माल्याला भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.

मल्ल्याने ट्विट करीत कर्जाचे 100 टक्के मुद्दल परत करतो, बँकांनी ते स्वीकारावे असे म्हटले आहे. याबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाला माहिती दिली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिले असल्याची माहिती मल्ल्याने दिली आहे.

 

LEAVE A REPLY

*