विजय मल्ल्याला ब्रिटनमध्ये अटक; जामीनावर लगेच सुटका

0
कर्ज बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याला आज ब्रिटनमध्ये पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर काही वेळातच त्याची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

विजय मल्ल्याची ही या वर्षातील दुसऱ्यांदा अटक होती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही अटक झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

आधीच एका प्रकरणात मल्ल्याची अटकेनंतर जामिनावर सुटका झाली आहे.  मंगळवारी(दि.०२)  दुपारी लंडनमध्ये वेस्टमीनिस्टर मजिस्ट्रेट कोर्टमध्ये मल्ल्या उपस्थित झाला होता. त्यानंतर अटक झाली असल्याचे समजते.

या प्रकरणातही त्यास जामीन मिळाला आहे. मल्ल्या वेगवेगळ्या बँकांचे नऊ हजार कोटी पेक्षा अधिक कर्ज बुडवून भारतातून फरार आहे.

कर्ज बुडवल्याचे निदर्शनास आल्यानंतर  कारवाईच्या धाकाने त्याने देश सोडला होता. त्यानंतर भारत सरकारकडून त्याचा पासपोर्टही रद्द करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

*