‘शुभमन गिल’ नावाचे वादळ; पंजाबकडून कर्नाटकचा पराभव

0
मुंबई | अंडर -१९ क्रिकेट वर्ल्डकप सलग चौथ्यांदा भारताने आपल्या नावावर केला. यात ‘मॅन ऑफ द सीरिज ठरलेल्या शुभमन गिलची बॅट सध्या चांगलीच तळपत असून विजय हजारे क्रिकेट स्पर्धेत   शतक साजरे करताना शुभमनने सहा चेंडूत सहा उत्तुंग षटकार खेचत युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

शुभमनच्या आजच्या १२३ धावांच्या खेळीने पंजाबने कर्नाटकाचा पराभव केला. खराब हवामानामुळे खेळ ४२ षटकांचा करण्यात आला होता. पंजाबने गिलच्या तुफान खेळीमुळे ४२ षटकांत २६९ धावा केल्या.  कर्नाटकला २७० धावांचे आवाहन देण्यात आले.

या लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानात आलेल्या कर्नाटकच्या टीमकडून लोकेश राहुलने तुफानी बॅटिंग केली. लोकेश राहुलने १०७ धावा कुटल्या. मात्र, लोकेश राहुलची ही खेळी विजय मिळवण्यात कामी आली नाही. कर्नाटकच्या टीमने ४२ ओव्हर्समध्ये ८ विकेट्स गमावत २६५ धावाच करू शकला.

LEAVE A REPLY

*