विदर्भात सरासरी 62 टक्के मतदानाचा अंदाज

0

मुंबई- लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात विदर्भात नागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया तसेच गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदारसंघांत शांततेत मतदान पार पडलं. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नागपूर लोकसभा मतदारसंघात 53.13 टक्के, वर्धा लोकसभा मतदारसंघात 55.36 टक्के, चंद्रपूर 55.97 टक्के, रामटेक 55.61 टक्के, भंडारा-गोंदिया 60.05 टक्के तर गडचिरोली-चिमूर मतदार संघात 61 टक्के मतदान झाले.

अंदाजानुसार सरासरी मतदानाची शक्यता पुढीलप्रमाणे- नागपूर लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी 58 टक्केपर्यंत मतदानाची शक्यता आहे. तसेच रामटेक लोकसभा मतदारसंघात 58 ते 60 टक्के, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुमारे 65 ते 68 टक्के, गडचिरोली-चिमूरला 70 ते 72 टक्के, भंडारा-गोंदिया 69 ते 71 टक्के तसेच वर्धा लोकसभा मतदारसंघात सरासरी 65 टक्के मतदानाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*