Video शॉर्टसर्किटमुळे पाच एकर ऊस जळून खाक ; शेतकऱ्याच्या स्वप्नांची झाली राख

लंघाणे (ता.शिंदखेडा) शिवारातील घटना

दोंडाईचा - श. प्र. Dondaicha

लंघाणे ता.शिंदखेडा (Shindkheda) येथे चार ते पाच एकर ऊसाच्या (Cane) क्षेत्राला शॉर्ट सर्किटने आग लागली असून ऊस जळून खाक झाल्याची घटना आज दि.१२ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. आग लागल्ये वृत्त समजताच गावातील तरुण व दोंडाईचा (Municipal Council) नगर परिषदेच्या (Fire brigade) अग्निशामक दलाची गाडी तात्काळ पोहोचल्याने आग आटोक्यात आली.

सरपंच जितेंद्र गिरासे यांच्या लक्षात आल्यावर त्यांच्यासह गावातील तरुणांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा शर्तीचा प्रयत्न केला. मात्र आगीचे रुद्र रूप धारण केले होते. दरम्यान दोंडाईचा नगर परिषदेचे अग्निशामक दलाची गाडी तात्काळ पोहोचल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली.

या परिसरातील ही दुसरी घटना घडली आहे. घटनेची माहिती तलाठी मनोहर पाटील यांना कळताच घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com