Saturday, April 27, 2024
Homeजळगावदेशदूत वारीचे अभंग...

देशदूत वारीचे अभंग…

देह मर्त्य सारे

देह मर्त्य सारे :

- Advertisement -

“””””””””””””””””””

मातीचा हा देह,

मातीत जाणार,

कधी मिळणार,

नाही पुन्हा.

होवू नको स्वार्थी,

कधी बेईमान.

मातीशी ईमान,

ठेव बाबा.

येण्या आत्म भान,

लाव मना ध्यास.

विठ्ठलाची कास,

सोडू नको

देह मर्त्य सारे,

मातीची खेळणी.

खेळविता धनी,

तोच आहे.

भना म्हणे जाण,

पंढरी महिमा.

नको जाणे धामा,

कोणत्याही.

© प्रा.बी.एन.चौधरी.

(९४२३४९२५९३)

- Advertisment -

ताज्या बातम्या