देशदूत वारीचे अभंग...

तुझा तू विठ्ठल : प्रा.बी.एन.चौधरी
देशदूत वारीचे अभंग...

तुझा तू विठ्ठल

तुझा तू विठ्ठल :

"""""""""""""""""""""

विठ्ठलच ध्यास,

विठ्ठलच श्वास.

विठ्ठल विश्वास,

जगण्याचा.

शोधावा सतत,

सुखात विठ्ठल.

दुःखात विठ्ठल,

आठवावा.

विठ्ठलाशी नाते,

जोडावे अखंड.

सोडुन त्रिखंड,

मोहमयी.

जगणे विठ्ठल,

मरणे विठ्ठल.

उरणे विठ्ठल,

व्हावे देवा.

भना म्हणे भज,

तुझा तू विठ्ठल.

तुझाही विठ्ठल,

होण्यासाठी.

© प्रा.बी.एन.चौधरी.

(९४२३४९२५९३)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com