Video धडगावात सातपुड्यातील रानमेव्याची आवक वाढली

खरेदीसाठी मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील व्यापारी दाखल

धडगाव | प्रतिनिधी- nandurbar

सातपुडाच्या रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीताफळाची आवक धडगाव शहरात मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे सिताफळ खरेदी साठी धडगाव शहरातीलच नव्हे तर मध्यप्रदेश,गुजरात येथील व्यापारी सुद्धा धडगाव शहरात दाखल होत आहेत.

सिताफळच्या विक्री साठी सातपुड्यातील धडगावही मोठी बाजार पेठ मानली जाते.खेड्यापाड्यावरून खूप मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव धडगाव शहरात सिताफळ विक्रीसाठी आणत असतात.

मागील वर्षी कोरोना संकट काळात देखील १०० रुपये ते १५० रुपये टोपली प्रमाणे भाव होता परंतु ह्या वर्षी सिताफळाच्या दरात सुद्धा मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येत आहे व १५० ते २०० रुपये प्रमाणे एक टोपली असा भाव सिताफळ विक्रेत्यांना मिळत आहे.

सिताफळाची आवक धडगाव मोठया प्रमाणात होऊन सुद्धा मेन बाजारपेठेच्या रस्त्याच्या कडेला विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते व वाहतूकांची कोंडी होतांना दिसून येते.धडगाव शहरात सिताफळ खरेदी-विक्रीसाठी कुठलीही बाजारपेठ नसल्यामुळे विक्रेत्यांना कमी किंमत भेटते

धडगाव शहरात सिताफळासाठी मोठी बाजारपेठ उभारावी जेणेकरून ह्या सातपुड्याचा रानमेव्याला जास्तीत जास्त भाव मिळेल व येथील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होईल.अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com