Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : सुरगाणा : झगडपाडा आंबुपाडा परिसरात विद्यार्थ्यांचा धोक्याचा प्रवास

Share

हतगड | लक्ष्मण पवार

सुरगाणा तालुक्यातील झगडपाडा ते शासकीय आश्रम शाळा आंबुपाडा (बेडसे) एक किलोमीटरचे अंतर पार करून विद्यार्थ्यांना पायपीट करत जावे लागते. यात एक पूलही आहे तोही ओलांडावा लागतो.

सुरगाणा पंचक्रोशीत पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे परिसरातील नदीनाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक भागामध्ये लहान पुल असून तेही पाण्याखाली गेले आहेत.

Surgana Rain

सुरगाणा तालुक्यातील झगडपाडा आंबुपाडा (बेडसे) येथे झालेल्या संततधार पावसामुळे पुलावरून पाणी जात आहे. रस्ता ओलांडण्यासाठी सर्वसामान्यांसह शालेय विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे.

Deshdoot यांनी वर पोस्ट केले शुक्रवार, २६ जुलै, २०१९

यामुळे शाळेतील मुलांना, जनावरांना, वाहनधारकांना जीव धोक्यात घालून नदीचा पुल ओलांडावा लागतो. येथील झगडपाडा , खोकविहिर , चिंचपाडा भेनशेत, काहांडोळपाडा या ठिकाणावरून ये-जा करणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्याच्या जीवाला यामुळे धोका निर्माण झाला आहे.

याठिकाणी मोठ्या उंचीचा पूल बनविण्यात यावा अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे. झगडपाडा ते आंबूपाडा (बेडसे) या दोन्ही गावातील मधील पुलावरून पाणी वाहते तरी नागरिकांना व शाळेतील मुलांना ,टू व्हीलर ,फोर व्हीलर ,या पुलावरून वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो तरी सबंधित विभागाने मोठया पुला ची मागणी करावी.

सुनील महाले, झगडपाडा

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!