रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर अन्…; महिलांनी सांगितली आपबिती

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | Nashik

तालुक्यातील सैय्यद पिंप्री (Sayyad Pimpri) मधील एका विहिरीत (well) काही दिवसांपूवी बिबट्याचे (Leopard) एक पिल्लू पडले होते. त्यावेळी वनविभागाच्या मदतीने ते पिल्लू बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याठिकाणी मादी आली आणि त्या पिल्लांना घेऊन गेली. या परिसरात असणाऱ्या बिबट्याच्या वावरामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले असून त्यांच्यावर दररोज बितणारी आपबिती येथील महिलांनी सांगितली आहे…

याबाबत माहिती देतांना महिलांनी (Women) सांगितले की, परिसरात लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर असल्याने याठिकाणी बिबट्याचा वावर असतो. तर रस्त्याने दररोज ३० ते ४० विद्यार्थी सायकलवर शाळेत जात असल्याने या विद्यार्थ्यांना बिबट्यांची भीती वाटते. त्यामुळे वनविभागाने (Forest Department) हे बिबटे मोठ्या जंगलात नेऊन सोडावे.

तसेच अगोदर या परिसरात लांडग्यांचा (Wolves) मोठ्या प्रमाणावर वावर होता. पंरतु,आता लांडग्यांचा वावर कमी झाला असून बिबट्यांचा वावर वाढल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना घराबाहेर पडणे देखील कठीण झाले आहे. याशिवाय हे बिबटे शेळ्या, मेंढ्या, वासरू, यासह मोठ्या जनावरांवरही रात्रीच्या वेळी हल्ला करतात. त्यामुळे वनविभागाने तात्काळ बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या महिलांनी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *