Saturday, April 27, 2024
Homeनाशिक...जेव्हा महिला शेतकरी जपते मातीशी नाते; 'पाहा' व्हिडीओ

…जेव्हा महिला शेतकरी जपते मातीशी नाते; ‘पाहा’ व्हिडीओ

नाशिक | Nashik

आदिम संस्कृतीपासून शेती आणि महिला (Woman) यांच अतूट नाते आहे. कृषी संस्कृतीचे बारकाव्याने निरीक्षण केले तर आपल्याला दिसून येते की, कितीही तंत्रज्ञान विकसित झाले तरी अगदी महत्वाची बारीकसारीक कामे महिलेशिवाय शक्य होत नाहीत.

- Advertisement -

नाशिक पदवीधर निवडणूक : ‘इतक्या’ उमेदवारांची माघार

जी स्री चुल आणि मुल यापुरती मर्यादित समजली जात होती ती शेकडो वर्षापासून शेतीच्या मातीशी (Soil) नाते जपत आली त्या मातीतून संपत्तीची निर्मिती करू लागली, मात्र तिच्या या योगदानाकडे समाजाने दुर्लक्ष केले.

तिच्या कर्तुत्वावर पडदा पडत राहिला. महिलेने गगनात भरारी घेतली, संसदेची सूत्रे हाती घेतली, दुसरीकडे तिने मातीची नाळही कायम राखली हे सत्य विसरून चालणार नाही. असेच एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील उपक्रमशील महिला शेतकरी (Woman farmers) कल्पना शिंदे ह्या होय.

Video : जिल्हा परिषदेच्या ‘स्मार्ट’ शाळेत विद्यार्थी गिरवत आहेत जीवनाचे धडे

कल्पना शिंदे या एक उत्तम, उपक्रमशील शेतकरी असून त्यांनी त्यांच्या नियोजनाखाली भली मोठी द्राक्षबाग (vineyard) जपली आहे. शिंदे या स्वत: लक्ष देऊन द्राक्षांच्या विविध जातींचे उत्पादन घेत असून त्यांनी आपल्या कष्टातून शेतात अतिशय सुंदर बाग फुलविली आहे. महिला अबला नाही तर सबला आहे ते त्यांनी आपल्या कष्टातून दाखवून दिले आहे.

नाशकात भाजपला ‘दे धक्का’; माजी नगरसेवकासह अनेकांचा ठाकरे गटात प्रवेश

तसेच शिंदे यांनी द्राक्ष शेतीबरोबरच भाजीपाल्याचीही लागवड केली असून एका पिकावर (Crop) अवलंबून न राहता इतर लहान,कमी खर्चाची पिके घेतल्यास कुटुंबाला आर्थिक हातभार लागत असल्याचे शिंदे सांगतात. याशिवाय शिंदे या त्यांच्या शेतात गिलकी, टोमॅटो, कारले यासह वेगवेगळ्या पिकांची बाजारातील मागणी लक्षात घेऊन उत्पादन घेत असतात.

नाशकात मनसेला मोठे खिंडार?

- Advertisment -

ताज्या बातम्या