Monday, April 29, 2024
HomeजळगावVideo महाराष्ट्रातून पळविलेला प्रकल्प आणून दाखवा-विरोधीपक्ष नेते अजित पवार

Video महाराष्ट्रातून पळविलेला प्रकल्प आणून दाखवा-विरोधीपक्ष नेते अजित पवार

पाचोरा – प्रतिनिधी pachora

महाविकास आघाडी सरकारने राज्यात आणलेला वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प (Vedanta-Foxconn Semiconductor Project) फडणवीस-शिंदे यांच्या नव्या सरकारने मोदी-शहांच्या गुजरातला (gujrat) जाऊ देण्यावरून पाचोरा येथील सभेत अजित पवारांनी सरकारला धारेवर धरले.

- Advertisement -

अभिनेत्री (सई) गौतमी देशपांडेने केलं हे चॅलेंज…!अभिनेत्री (सई) गौतमी देशपांडेने केलं हे चॅलेंज…!

वेदांता प्रकल्पावरून देखील त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना आव्हान दिले. तसेच शिंदे यांनी मोदी-शहांच्या लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन दिल्लीत जावून पंतप्रधान मोदींची भेट घ्यावी आणि महाराष्ट्रातून गुजरातला पळविलेला हा प्रकल्प पुन्हा राज्यात आणावा असे आव्हान अजित पवार यांनी दिले.

पुन्हा दुसरा प्रकल्प महाराष्ट्रात आणू, असे गाजर दाखवू नये. अशी कोपरखळी त्यांनी मारली. पाचोऱ्यातील सभेत अजित पवार यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर त्यांच्या शैलीत घणाघाती आरोपांची सरबत्ती केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या