Video : ३६५ दिवस शाळा, ४०० पर्यंतचे पाढे तोंडपाठ; जाणून घ्या बहुचर्चित 'हिवाळी शाळा' नेमकी आहे तरी कशी?

नाशिक | Nashik

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) हरसूलपासून (Harsul) ४० किलोमीटरवर डोंगरदऱ्या आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हिवाळी (Hiwali village) हे गाव. गावची लोकसंख्या ही अवघी दोनशे. आज हे गाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील (Zilla Parishad School) शिक्षणामुळे व विद्यार्थ्यांमधील असलेल्या कलागुणांमुळे राज्यात सर्वत्र परिचित झाले आहे...

ही शाळा वर्षातील ३६५ दिवस सुरु असते. याठिकाणी विद्यार्थ्यांना (Students) दररोज सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत शिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे या शाळेतील पहिली ते पाचवीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना तब्बल ४०० पेक्षा अधिक पाढे तोंडपाठ असून भारतीय संविधानातील (Constitution of India) सगळीच कलम पाठ आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्ग, जगभरातील देशांच्या राजधान्या हे देखील या शाळेतील विद्यार्थी पुस्तक न पाहता सांगतात. इतकंच नव्हे तर स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने विचारण्यात येणारी गणिते आणि तार्किक प्रश्नांची उत्तरेही हे विद्यार्थी अचूक देतात. याशिवाय दोन्ही हातांनी एकाच वेळी लिहिण्याची कलाही हे विद्यार्थी अवगत आहेत.

हिवाळी शाळेत प्रवेश करताच सर्व भिंती वारली पेंटिंगने तसेच विविध नद्या, फळे, गावांची नावे याने रंगवल्याचे नजरेस पडते. बालवाडीच्या वर्गांमध्ये खेळणी, शाळेत डिजिटल रूम, वाचनालय यासोबतच सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी प्रोजेक्ट रूमही येथे तयार करण्यात आली आहे. याशिवाय अनेक टाकाऊ वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गोष्टी तयार केल्या आहेत. येथील विद्यार्थी विविध कलागुणांमध्ये पारंगत आहेत. यामध्ये पेंटर, फिटर, टीचर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर आदी कामे विद्यार्थी स्वतः करतात. हे सर्व या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत अवलिया शिक्षक केशव चंदर गावित. (Teacher Keshav Chander Gavit)

केशव गावित यांनी एम. ए. राज्यशास्त्र आणि डी.एड.चे शिक्षण घेतले आहे. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना स्पर्धा परीक्षेसाठी (Competitive Exam) जीवतोड मेहनत घेतली. घरची हालाखीची परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. पंरतु, परीक्षा देण्यापुरताही पैसा खिशात नसल्याने त्यांनी मार्केट यार्डात ४० रुपये रोजाने हमाली केली. एकीकडे पाठीवर कॅरेट वाहत असताना दुसरीकडे उरलेल्या वेळेचा सदुउपयोग करत एमपीएससीचा अभ्यास त्यांनी केला. त्यांच्या घरात सन २०१३ पर्यंत विजेचा दिवाही नव्हता. त्यामुळे रात्रीच्या वेळी चिमणी (दिवा) च्या प्रकाशातच अभ्यास होत. परंतु, तरीही यशाने त्यांना हुलकावणी दिली.

आपला शैक्षणिक पाया पक्का असता तर आपण एमपीएससी (MPSC) उत्तीर्ण झालो असतो, ही खंत त्यांच्या मनाला अस्वस्थ करत होती. अशातच डीएड पूर्ण झाल्यावर २००९ मध्ये ते हिवाळी येथील शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. या शाळेत आल्यावर त्यांचा दृष्टीकोन बदलला. आपले स्वप्न या शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे त्यांनी मनोमन ठरविले. गावित ज्यावेळी शाळेत रुजू झाले त्यावेळी केवळ एकच वर्ग खोली होती. त्यानंतर गावातील दोन लोकांनी पुढाकर घेऊन शाळेसाठी आपले राहते घर (House)सोडले. या दोघांच्या घराच्या जागेवर आज छानशी एक टुमदार शाळा उभी राहिली असून गावित हे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करत आहे. विद्यार्थीही याचा पुरेपूर फायदा घेऊन एमपीएससी, युपीएससी परीक्षेसाठी शालेय जीवनातच धडे गिरवत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com