Saturday, April 27, 2024
HomeनगरVIDEO : संगीतातील प्रदूषण रोखणे आपल्या हाती!

VIDEO : संगीतातील प्रदूषण रोखणे आपल्या हाती!

अहमदनगर (प्रतिनिधी)-

जर निसर्ग प्रदुषित होत असेल तर निसर्ग देणगी असलेले संगीतही प्रदुषित होत आहे. अलिकडे संगीताचे नावाने जो गोंधळ सुरू आहेत. त्यावर नजर फेरली तर रिमिक्स, आयटम साँग, पब किंवा संगीत स्टुडिओतील सिगारेटचा धूर या गदारोळातील संगीतही प्रदुषित म्हटले पाहिजे. यासाठी आपण अभिजात आणि मनाला आनंद देणारे संगीत जपले पाहिजे आणि संगीत प्रदूषण रोखले पाहिजे, अशी मांडणी सार्वमत-देशदूत वेब व्याख्यानमालेत निसर्गोपचार तज्ज्ञ व संगीत चिकित्सक डॉ.संतोष बोराडे यांनी पाचवे पुष्प गुंफतांना केली.

- Advertisement -

डॉ.बोराडे म्हणाले, मला काही काही लोकं भेटल्यावर म्हणतात, जून्या चाली चांगल्या होत्या. नव्या चाली काही चांगल्या नाहीत. पण चाली अशा चांगल्या किंवा वाईट नसतात. पण जुन्या लोकांची चाल चांगली होती, हे कोण नाकारणार? आज जे संगीत बनतयं, त्याच्या प्रदुषणाचे अनेक किस्से आहेत. त्याचे पडसाद संगीतावर उमटतात. तुमचा विचार, आचार आणि समोवतालचे वातावरण या परिपाकातून निर्माण होणार्‍या संगीतावर विचार व्हायला हवा. संगीत निवड योग्य असली पाहिजे. जगातील कोणतीही थेरपी आपल्यासाठी तीन महत्त्वाची कामे करते. पहिले म्हणजे आराम, दुसरे म्हणजे बदल आणि तिसरे म्हणजे स्फूर्ती. असे एखादे संगीत आपल्याकडे असेत तर ते तुमच्यासाठी थेरपी ठरेल. आजही आपण जूनी गाणी ऐकताना आपल्यातील भावना आपोआप व्यक्त होतात. कारण संगीतात तुमच्या भावना व्यक्त करण्याची ताकद आहे. किस्से आणि गीतांच्या माध्यमातून डॉ.बोराडे यांनी संगीताचे आपल्या मानसिक आरोग्यावर आणि जीवनावर होणारे परिणाम विषद केले. यावेळी त्यांनी ऑनलाईन असलेल्या श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

प्रारंभी शिक्षण अभ्यासक संदीप वाकचौरे यांनी त्यांचा परिचय करून दिला. दररोज सायंकाळी 7 वाजता वेब व्याख्यानमाला ऑनलाईन प्रसारित होत आहे.

‘महाराष्ट्र आणि शिक्षण’

शनिवारी, 29 मे रोजी शिक्षणक्षेत्राच्या अभ्यासक हेमांगी जोशी या ‘महाराष्ट्र आणि शिक्षण’ या विषयावर सहावे पुष्प गुंफणार आहेत. टाटा सामाजिक संस्थेतून उच्चशिक्षण प्राप्त केल्यानंतर शिक्षण विकासासाठी त्यांनी काम केले. शिक्षण हक्क फोरमच्या समन्वयक, उन्नती संस्थेच्या संस्थापक, स्थलांतरित बालकांच्या शिक्षणासाठी आग्रही भुमिका घेणार्‍या कार्यकर्त्या म्हणून त्या परिचित असून शिक्षण प्रक्रियेच्या अभ्यासाठी देश-परदेशात दौरे केले आहेत.

वाचक-रसिकांसाठी या वेब व्याख्यानमालेचे ऑनलाईन प्रसारण www.deshdoot.com या संकेतस्थळासह युट्यूबचे deshdoot या चॅनलवर दररोज सायंकाळी 7 वाजता होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या