Video Story : मी लस घेतली, छान वाटतंय, तुम्हीही घ्या!

Video Story : मी लस घेतली, छान वाटतंय, तुम्हीही घ्या!

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमध्ये आता युवावर्गाच्या लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. ३० ते ४४ वर्ष या वयोगटातील नागरिकांना आता थेट लसीकरण केंद्रावर नंबर लाऊन लस घेता येणार आहे. त्यामुळे या आठवड्यात तरुणाईची मोठी गर्दी लसीकरण केंद्रांवर दिसून आली...

आपल्या घरात आई वडिलांनी लस घेतली होती, त्यांना खूप त्रास त्रास झाला त्यामुळे तरुणाई काहीशी बिथरलेली दिसून येत आहे. परंतु तरुणाईने लस घेताना मानसिक ताण घेऊ नये, लसीकरण झाल्यानंतर आराम करावा. इंजक्शनसारखे थोडासा त्रास होतो, त्यानंतर मात्र काहीही होत नाही.

दुसऱ्या दिवशी अंगदुखी आणि काहींना ताप येतो. यावेळी हॉस्पिटलकडून देण्यात आलेली एक गोळी घेतली की तापही उतरतो. त्यांनतर मात्र, कुणालाही या लसीचा त्रास होत नाही. आज लसीकरण झालेल्या नागरिकांशी आमच्या प्रतिनिधीने चर्चा केली. यावेळी आनंदाने लस घेण्यासाठी जावे असे आवाहन या लसस्वी झालेल्या नागरिकांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com