Friday, April 26, 2024
HomeनाशिकGround Report : पावसाचे पाणी साठवून धुवावी लागतात भांडी; मालेगाव तालुक्यातील मेहूणे...

Ground Report : पावसाचे पाणी साठवून धुवावी लागतात भांडी; मालेगाव तालुक्यातील मेहूणे गावातील भीषण वास्तव

मेहुणे (ता. मालेगाव) |टीम देशदूत

मेहुणे गावात ५६ खेडी पाणीपुरवठा योजना आहे, मात्र महिन्याभर येथे पाणीपुरवठा होतो. रिकाम्या पाईपलाईन मधील गढूळ पाणी बाहेर निघेपर्यंत कुठेतरी पाईपलाईन फुटल्याचे कारण समोर येते अन पुन्हा एकदा ही पाईपलाईन पुढील महिनाभर बंद राहते. नदीकाठी वसलेल्या गावात पाण्याची वणवण पाहायला मिळते.

- Advertisement -

येथील गावात पाण्याचे भीषण चित्र बघायला मिळते. कुणी पत्र्याच्या नळीतून येणाऱ्या पावसाचे थेंब वाचवते आहे. तर कुणी, घरातील सर्वच भांडी भरून गढूळ पाण्याच्या थर खाली बसेपर्यंत थांबून हे पाणी पिण्यायोग्य करते आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेला पाण्याचा हा संघर्ष कधी संपेल हे त्यांनाही कुणाला सांगता येईना. सरपंचपद वर्षभरासाठी असते त्यामुळे गावाचा विकास काय करणार याची रंगीत तालीम घेईपर्यंत सरपंच बदलतो. अशीच काहीशी परिस्थिती या गावातील आहे. दैनिक देशदूतच्या टीमने या गावात जाऊन सत्यपरिस्थिती जाणून घेतली आहे….

- Advertisment -

ताज्या बातम्या