Video : आता एकच ध्यास! गाव करणार 'सुजलाम सुफलाम'; 'पाहा' काय म्हणताय आसरबारीच्या सरपंच?

नाशिक | अनिरुद्ध जोशी

पेठ परिसरात ४ महिने धो-धो पाऊस पडतो. त्यानंतर मात्र येथील छोटी-मोठी गावे पाण्यापासून वंचितच राहतात. तालुक्यातील आसरबारी हे गाव देखील पाणी टंचाई ग्रासलेलेच आहे. मात्र गावाला पाणी टंचाईपासून मुक्त करणारच, असा निर्धार येथील नवनियुक्त सरपंच गीता विशाल जाधव यांनी केला आहे....  

गेल्या काही दिवसांपूर्वीच पेठ तालुक्यात सरपंचपदाची निवडणूक पार पडली. या गावातून गीता विशाल जाधव या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. ग्रामपंचायतीत सरपंचासह एकूण आठ सदस्य आहेत. तालुक्यातील आसरबारी या छोट्याशा गावाला आजूबाजूने धरणं लाभलेली आहेत. तरीही येथील पावसाळा संपला की, भीषण पाणी टंचाई उद्भवते. गेल्या कित्येक वर्षांपासून येथील पाण्याचा प्रश्न काही सुटत नाही. मात्र आता नुकत्याच सरपंचपदी निवडून आलेल्या जाधव यांनी पाण्याच्या प्रश्नापोटी पुढाकार घ्यायचा निर्धार केला आहे. 

जाधव म्हणाल्या की, संपूर्ण गावाचा कायापालट करायचा आहे. येथील मुख्य प्रश्न म्हणजे पाणी टंचाई. धरण जवळ असली तरी पाणी गावापर्यंत पोहोचत नाही. परिसरातील पाझर तलाव पूर्णपणे सपाट झाला असून यात पाणी थांबत नाही. त्यामुळे आमचा एकच ध्यास आहे की, सर्वप्रथम पाणी टंचाई दूर करून गावाची तहान भागविणे, अशी प्रतिक्रिया त्यांनी देशदूतशी बोलताना दिली आहे.

दरम्यान, गावातील एकंदरीत परिस्थिती पाहता येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि मजूरकाम आहे. गाव छोटे असले तरी गावातील नागरिकांची एकजूट मात्र कायम आहे. गावातील प्रत्येक नागरिक एकमेकांशी अगदी गुण्यागोविंदाने वागतात. याचा प्रत्यय आज झालेली उपसरपंचपदाची बिनविरोध निवडणूक होय. या गावाचा पाणी प्रश्न लवकरात लवकर मिटावा, अशीच अपेक्षा  गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com