Video : धरण उशाशी अन् कोरड घशाशी! पाहा त्र्यंबक तालुक्यातील 'या' गावची व्यथा

नाशिक | मोहन कानकाटे

त्र्यंबकेश्वरपासून (Trimbakeshwar)९ किलोमीटरवर धुमोडी (Dhumodi) हे गाव असून गावची लोकसंख्या ही अवघी ८०० ते १००० च्या आसपास आहे. गावालगत पटकीचे शिवार (Pataki Shiwar) असून तेथे एक बंधारा (Embankment)आहे. त्याला येथील ग्रामस्थ पटकीचा बंधारा असे म्हणतात. पंरतु, बंधारा जरी गावाजवळ असला तरी धुमोडीच्या ग्रामस्थांची 'धरण उशाशी अन् कोरड घशाशी' या म्हणीप्रमाणे कित्येक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याशी (water) असलेली लढाई सुरु आहे...

धुमोडी गावातील या पटकीच्या बंधाऱ्याचे काम सन १९८४ साली झाले. काही कालावधीनंतर मात्र बंधाऱ्यातून गळती होऊ लागल्याने पाणी साचत नव्हते. त्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी बंधाऱ्यांची पाहणी करून डागडूजीसाठी सन २०१८ साली जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत (Jalyukta Shiwar Yojana) शासनाने ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. यानंतर बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली. पंरतु त्याचा कुठलाच फायदा झाला नाही.

याबाबत येथील ग्रामस्थ सांगतात की, सुरुवातील बंधाऱ्याला एकच बोगदे होते. पंरतु, ज्यावेळी सन २०१८ साली जलयुक्त शिवार योजेनेच्या माध्यमातून बंधाऱ्याचे डागडूजीचे काम केले गेले ते निकृष्ट दर्जाचे (Inferior Quality) होते. त्यामुळे बंधाऱ्याला आणखी दोन बोगदे पडले आणि बंधाऱ्यातील पाणी आणखी कमी व्हायला लागले. हा बंधारा वनविभागाच्या क्षेत्रात (Forest Department) असल्याने याठिकाणी जंगली प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. या जंगलातील प्राणी पाणी पिण्यासाठी बंधाऱ्यावर येतात. त्यांना जोपर्यंत बंधाऱ्यात पिण्यासाठी पाणी आहे तोपर्यंत मिळते. मात्र, उन्हाळ्यात (Summer) त्यांना पिण्यासाठी बंधाऱ्यात पाणी नसल्यामुळे ते गावाकडे मार्गक्रमण करून गावातील लहान-मोठ्या व्यक्तींवर हल्ले करतात.

सध्या या बंधाऱ्याच्या पाण्यावर ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच शेती (Agriculture) आणि जनावरांचे जीवन अवलंबून आहे. पंरतु,बंधाऱ्यातून नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच पाणी कमी व्हायला लागल्यामुळे जानेवारीपर्यंत बंधारा कोरडा ठाक पडण्याची शक्यता आहे. तसेच जोपर्यंत पावसाळा (Rainy Season) सुरु होत नाही तोपर्यंत येथील गावकऱ्यांना पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या बंधाऱ्याची पुन्हा एकदा दुरुस्ती करून दीर्घकाळ पाणी साठेल याकरिता काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ (Villagers) करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com