Video : पालखेडचा विसर्ग वाढला; नदीकाठी सावधानतेचा इशारा

Video : पालखेडचा विसर्ग वाढला; नदीकाठी सावधानतेचा इशारा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पालखेड धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ करण्यात आली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभर संततधार पावसाने हजेरी लावल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने विसर्ग १ हजार ३११ क्युसेक इतका करण्यात आला आहे....

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Palkhed Dam Water catchment area) क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे नदी व नाल्यांद्वारे घरणात पाण्याची आवक वाढली आहे.

पालखेड धरणाचे (R.O.S) परिचालन सुचीनुसार आवश्यक असणारी पाणी नदीत विसर्ग करण्यात येणार असल्याचे सकाळी सांगण्यात आले होते. यावेळी पालखेड धरणाच्या गेटमधुन/सांडव्याद्वारे कादवा नदित नजीकच्या काळात पुरपाणी साेडले.

पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे दिंडाेरी व निफाड तालुक्यातील कादवानदीकाठच्या दाेन्ही तीरावरील लाेकांनी सतर्कता बाळगावी म्हणून संबंधीत गावांना सावधनतेचा इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.