बोरी नदीला पूर ; नदीकाठच्या गावांना इशारा
व्हिडिओ स्टोरी

बोरी नदीला पूर ; नदीकाठच्या गावांना इशारा

तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांनी केल्या सूचना

Rajendra Patil

राजेंद्र पोतदार

अमळनेर - Amlner

येथील बोरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने बोरी मध्यम प्रकल्पात पाण्याचा साठा वाढला आहे. त्यामुळे शहरातील बोरी नदी दूथडी भरून वाहात आहे.

या प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने बोरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदी काठावरील सर्व गावांना अमळनेर तालुक्यात प्रशासनातर्फे मध्य रात्रीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बोरी धरणाची पाणी पातळी २६६.८५ मी. झाली आहे. पाणी साठा मोठ्या प्रमाणात झाल्याने शुक्रवारी मध्यरात्री ०१.०० वाजता धरणाचे ११ दरवाजे ०.१५ मी ने उघडून ४९६१ क्युसेक विसर्ग नदी पात्रात सुरु आहे. त्यामुळे

तालुक्यातील बोरी नदीच्या काठावर असलेल्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन तहसिलदार मिलिंदकुमार वाघ यांनी केले आहे. दरम्यान बोरी नदीला यावर्षी प्रथमच पूर आल्याने पाहाण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती.

Deshdoot
www.deshdoot.com