औरंगाबाद – aurangabad
राज्यासह इतर राज्यातून लाखो भाविक (Paithan) पैठणच्या नाथ षष्ठी सोहळ्यासाठी येतात. यामध्ये जवळपास 600 दिंडी दाखल होतात. या दिंडी प्रमुखांनी पैठणमध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांच्या दिंडीतील सदस्यांसह (Covid vaccine) कोविड लस घेणे आवश्यक आहे. लस घेतल्याबाबतच्या पुराव्यासोबत ओळखपत्र म्हणून (Aadhar Card, Driving License) आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सही सोबत असू द्यावे, अशी विनंती (Collector Sunil Chavan) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नाथ मंदिर विश्वस्तांमार्फत सर्व दिंडी प्रमुख आणि भाविकांना केली आहे.