Video विनोद पाडर यांच्या लोटांगण आंदोलनामुळे बोदवडकर भारावले

स्वत:ला जाळून घेण्याचा दिला इशारा, सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र ढिम्म, आमदारांचे कारवाईचे आदेश
Video विनोद पाडर यांच्या लोटांगण आंदोलनामुळे बोदवडकर भारावले

बोदवड - प्रतिनिधी Bodwad

बोदवड शहर, भुसावल रोड, मलकापुर रोड़ येथील रस्त्यांची अक्षरशः चाळनी झालेली असून रोज या रस्त्यांवर अपघात घडत आहे. याबाबत शिवसेनेचे विनोद पाडर यांनी वारंवार तक्रार करून पाठपुरावा केला, मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने आज पाडर यांनी निवडक कार्यकर्त्यांसह लोटांगण आंदोलन केले.

शासनाचे लक्ष्य वेधन्या साठी विनोद पाडर यांनी लोटांगण आंदोलन केले. तसेच रस्ता दुरुस्त न झाल्यास यां खड्यात स्वतला जाळुन घेण्याचा इशारा ही त्यानी यां वेळेस दिला. विशेष बाब म्हणजे आमदार चंद्रकांत पाटिल यांनी रस्ते दुरुस्ती साठी कालच आढावा बैठक घेतली व 3 दिवसात काम सुरु न झाल्यास रस्त्यावर उत्तरण्याचे सुद्धा सांगितले.

संबंधित ठेकेदार जाणुन दुर्लक्ष करीत असल्यास त्याला ब्लैक लिस्ट करण्यात येईल असेही ते म्हणाले. बोदवड ते साळशिंगी हा भुसावळ आणि जळगाव जाणारा प्रमुख मार्ग आहे. मात्र या रस्त्यावर प्रचंड मोठ्या खड्ड्याची मालिका आहे.

यामुळे येथे वारंवार अपघात घडत आहेत. सकाळ व सायंकाळ प्रहरी या रस्त्यावर नागरिकांची फिरण्यासाठी लगबग सुरू असते, मात्र या रस्त्यावर त्यांना धड चालता सुद्धा येत नाही.सदर रस्ता तात्काळ दुरुस्ती व्हावा म्हणून जनसेवक विनोद पाडर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री बेंडकुळे यांच्याकडे वारंवार लेखी व पुराव्यानिशी पाठपुरावा केला होता. मात्र अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही म्हणून लोटांगण आंदोलन करण्यात आले. अशी माहिती पाडर यांनी दिली.

गेल्याच आठवड्यात या रस्त्यावर ठेकेदाराकडून मुरूम आणि माती टाकून थातूरमातूर डागडुजी करण्यात आली होती. मात्र केवळ आठवड्यात या ठिकाणची माती वाऱ्यावर वाहून गेली. त्यामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत जनसेवक विनोद पाडर यांनी रस्त्यावर झोपून व लोटांगण घेऊन आंदोलन केले. जनतेच्या पैशांतून होणाऱ्या कामात भ्रष्टाचार होत असून, संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी त्यांनी केली.

आंदोलनाच्या वेळी ता.प्रमुख गजानन खोडके,ता.संघटक शांताराम कोळी, उपजिल्हा प्रमुख कलिम शेख,शहर प्रमुख हर्षल बडगुजर, अ.ता.प्रमुख अय्युब कुरेशी,विभाग प्रमुख गोपाळ पाटील,दीपक माळी,अतिष सारवाण, सुवर्णसिंग राजपूत,पवन माळी,सुनील बैदे,अप्पू भांजा, भूषण भोई, मुकेश महाजन,समीर शेख उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com