Video : मेथी मातीमोल; कोथंबीर शेकडा 2500 रुपये

आवक कमीमुळे कोथंबीर भाव वधारला
Video : मेथी मातीमोल; कोथंबीर शेकडा 2500 रुपये

नाशिक l Nashik

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आज (दि. २४) कोथंबीरची आवक कमी झाल्यामुळे दोन दिवसापुर्वी असलेला शेकडा ७०० ते ८०० रुपयांचा भाव २००० ते २५०० रुपया पर्यत जाऊन पोहचला.

मात्र मेथीची मोेठ्या प्रमाणात आवक होत असल्याने भावात अद्यापही सुधारणा न झाल्यामुळे मेथी उत्पादक शेतकर्‍याच्या पदरी निराशा पडत आहे. यामुळे शेतकर्‍यांत तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे.

राज्यातील जानेवारीच्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यात अवकाळी पावसाचा फटका बहुतांशी जिल्ह्याला बसला होता. यात नाशिक जिल्ह्यात अवकाळीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन यात भाजीपाल्याचा समावेश होतो. याचा परिणाम आता भाजीपाल्यावर होत असल्याचे बघायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसापासुन नाशिक कृषी बाजार समिती आवारात मेथी, कोथंबीर, शेपू, कांदा यासह भाज्याची आवक काही दिवसापासुन कमी झाली आहे. यामुळे आता भावात काहीअंशी सुधारणा होत आहे. यात सुरू असलेली लग्नसराई आणि लागु येत असलेल्या सुट्ट्यांमुळे गेल्या दोन दिवसापासुन भाज्यांची आवक कमी झाली आहे.

याचा परिणाम भावावर झाल्याचे आज दिसुन आले. कोथंबीर कमी आल्यामुळे यास चांगला भाव मिळाल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. नाशिक मार्केट समिती आवारात गेल्या दोन तीन दिवसापुर्वी कोथंबीर भाव शेकडा ७०० ते ८०० इतका असतांना आज आवक कमी झाल्यामुळे भाव २००० ते २५०० रुपये इतका मिळाला.

यामुळे कोंथबीर उत्पादक शेतकरी खुश झाला. तर मागील महिन्यात मेथीचा अवघा २०० ते ५०० रुपये शेकडा भाव मिळत होता, आता यात सुधारणा झाली असली तरी शेतकरी नाखुश असुन उत्पादनासाठी लागणारा खर्च निघत नसल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहे.

आज मेथीला केवळ १००० ते १२०० रुपये शेकडा भाव मिळाला. तसेच भाज्यांना मिळणारा कमी भाव पाहता इतर शेतीमालाप्रमाणे भाज्यांना देखील हमी भाव मिळावा अशी मागणी शेतकरी करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com