Video : पावसाळ्यानंतर पाण्यासाठी वणवण, शेती करायची तरी कशी?; येवला तालुक्यातील तरुण शेतकरी हतबल

नाशिक | Nashik

महाराष्ट्रात (Maharashtra) ठिकठिकाणी जलसिंचनाच्या प्रकल्पांसाठी (Irrigation Projects) मोठमोठ्या योजना राबविल्या जातात. मात्र नाशिक जिल्ह्यात असेही काही तालुके आहेत की, जे जलसिंचनांच्या प्रकल्पांपासून वंचित आहेत. त्यापैकीच एक तालुका म्हणजे येवला (Yeola) होय.

येवल्याहून राजापूरकडे (Rajapur) जातांना जलसिंचनांच्या प्रकल्पांची असलेली परिस्थिती प्रकर्षाने जाणवते. यासंदर्भात देशदूतच्या टीमने येवला तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत चर्चा केली असता त्यांनी याठिकाणच्या पाण्याच्या (Water) कमतरतेचे दाहक वास्तव उलगडून सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Video : पावसाळ्यानंतर पाण्यासाठी वणवण, शेती करायची तरी कशी?; येवला तालुक्यातील तरुण शेतकरी हतबल
Video : 'असे' आहे ममदापूर येथील हरीण संवर्धन केंद्र; पाहा देशदूतचा खास Ground Report

याबाबत बोलतांना शेतकरी सुनिल वर्हे आणि महेश वर्हे म्हणाले की, येवला ते राजापूरमधील काही भाग हा संपूर्ण खडकाळ आहे. त्यामुळे पावसाचे (Rain) पाणी जमिनीत झिरपत नसल्याने येथील पाण्याची पातळी उंचावत नाही. तर हिवाळा (Winter) संपेपर्यंत पाण्याची कमतरता जाणवायला लागते.

Video : पावसाळ्यानंतर पाण्यासाठी वणवण, शेती करायची तरी कशी?; येवला तालुक्यातील तरुण शेतकरी हतबल
Video : ...अखेर 30 तासांच्या प्रतीक्षेनंतर बछडे मादीच्या कुशीत

तसेच या परीसरातील शेती (Agriculture) ही केवळ पावसाळ्यातील एका पिकावर अवलंबून असते. त्यामुळे नांगरणी करून शेतीला आराम देण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. तर कधीकधी पिण्याच्या पाण्यासाठी दुसऱ्याच्या विहिरीवर जावे लागते. याशिवाय जनावरांसाठी कधी पाणी देखील उपलब्ध होत नाही. त्यामुळे ही भयाण परिस्थिती येथील शेती आणि समाजाच्या विकासात मोठा अडथळा ठरत आहे.

Video : पावसाळ्यानंतर पाण्यासाठी वणवण, शेती करायची तरी कशी?; येवला तालुक्यातील तरुण शेतकरी हतबल
Video : ममदापूर संवर्धन केंद्रात हरणांना कसे जोपासले जाते? जाणून घ्या व्हिडीओच्या माध्यमातून

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com