Friday, April 26, 2024
HomeनाशिकVideo : दिंडोरी तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट; द्राक्षबागांना फटका

Video : दिंडोरी तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट; द्राक्षबागांना फटका

ओझे | विलास ढाकणे | Oze

दिंडोरी तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वातावरण सतत बदल होत अजून काल सांयकाळी तालुक्यात बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजरी लावली होती. मात्र रात्री १ वाजेच्या सुमारास ओझे, नवळवाडी, म्हेळुस्के परिसरात अवकाळी पावसासह गारपिट झाल्याने द्राक्षबगांसह कांदा, गहू, हरबरा, भाजीपाला पिकांची नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आधीच कर्जबाजारी झालेला बळीराजा पुन्हा संकटात सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे…

- Advertisement -

रात्री पडलेल्या पावसामुळे द्राक्षबागाचे खुडे व्यापारी वर्गाने बंद केले आहे. सध्या तालुक्यात द्राक्षबागाचा हंगाम निम्म्यावर आला असून अजून तीन दिवस नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

रात्री पडलेल्या पावसामुळे सकाळी ११ वाजेपर्यत द्राक्ष घडामध्ये पाणी साचून होते ज्या द्राक्षबागा १०० टक्के देण्यासाठी आल्या आहे व ज्या निर्यातक्षम द्राक्षबागांना पेपर लावलेले आहेत अशा द्रक्षबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

नाशिक-मुंबई महामार्गावरून जाताय? आधी ही बातमी वाचा

आणखी तीन दिवस पावसाळी वातावरण असल्यामुळे पुढे किती नुकसान होणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. प्रत्येक वर्षी पडणाऱ्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून प्रत्येक वर्षी कर्जाचा डोंगर वाढत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

पावसाळा, उन्हाळा की हिवाळा? नाशिककर संभ्रमात

त्यामुळे शेती व्यवसाय अतिशय धोक्याच्या वळणावर आहे. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून अवकाळीने हजेरी लावल्यामुळे द्राक्षाच्या भावात घसरण पाहण्यास मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या