Video : ...जेव्हा डॉ. भारती पवार चहाच्या टपरीवर कार्यकर्त्यांना वाटतात चहा

Video : ...जेव्हा डॉ. भारती पवार चहाच्या टपरीवर कार्यकर्त्यांना वाटतात चहा

मनमाड | manmad

मंत्री झाल्यानंतर काहींचे राहणीमान बदलून जाते. मात्र काही नेते असे ही असतात की, त्यांच्यातला साधेपणा कायम असतो, याचा प्रत्यय कळवण (Kalvan) भागातील जनतेला आला. केंद्रात मंत्री पदावर वर्णी लागल्यानंतर आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) या त्यांच्या गावी कळवण भागात आल्यावर त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती...

मिरवणूक सुरू असताना त्यांना चहाची तलब लागली आणि त्यांनी थेट एका टपरीवर जाऊन चहा घेतला. इतकेच नव्हे तर हातात चहाची केटली घेऊन आ. राहुल आहेर (Rahul Aher) व इतर कार्यकर्त्यांना चहा दिला. चहा घेतल्यानंतर त्यांनी त्याचे पैसे देखील दिले. मनमिळवू आणि साधेपणासाठी डॉ. भारती पवार या ओळखल्या जातात मात्र केंद्रात मंत्री झाल्यावरदेखील त्यांनी साधेपणा कायम ठेवल्याचे पाहून लोकांना सुखद धक्का बसला. पाहा व्हिडीओ....

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com