Thursday, April 25, 2024
Homeनाशिकव्हिडिओ स्टोरी : भूमिगत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असणाऱ्या रस्त्यावर दोघांचा मृत्यू

व्हिडिओ स्टोरी : भूमिगत पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असणाऱ्या रस्त्यावर दोघांचा मृत्यू

सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

सातपूर अंबड लिंक रोडवर स्मार्ट सिटी उपक्रमातर्गत भूमिगत गॅस पाईप लाईन टाकण्याचे काम गतीने सूरू असून यासाीं रस्त्यावर खोदण्यात आलेल्या खड्यांतपडून 15 दिवसांपूर्वी मनपा कर्मचार्‍याया आठवर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता.

- Advertisement -

नुकताच काम बजरंग नगर येथील 26 वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहन चालकाच्या ठोकरीत कृत्यू झाला. त्यामुळे या परिसरातील नागरीकांकडून तिव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

सातपूर अंबड लिंक रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाला असून रस्त्यांच्या कामामुळे हा दुसरा बळी ठरला आहे. वाहतुकीचे तातडीने नियोजन करावे व रस्ता दुरुस्ती कामे वेगाने पूर्ण करावी अशी मागणी नगरसेवक भागवत आरोटे यांनी केली आहे.

या सदस्यांच्या कामाच्या वेळी यापूर्वी मनपा कामगार अपघाताला सामोरे जावे लागले होते त्यात त्यांच्या बालकाचा मृत्यू झाला होता एकतर्फी वाहतूक सुरू असल्याने भरधाव वेगाने जाणार्‍या चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. या प्रकरणी सातपूर पोलिस तपास करीत आहेत.

शासनाच्या अधिसूचने प्रमाणे रस्त्यावर करायच्या कामाला वेळेचे निर्बंध लावण्यात आलेले आहेत. मात्र ठेकेदारावर आमदारांचा वरसहस्त असल्याने काम चलाऊ पध्दत वापरली जात आहे. लहान मोठ्या गुन्हांचा तपास करण्यात पोलिस तातडीने धाव घेतात, मात्र अपघातात मयत होऊनही पोलिस तपासाला हलगर्जीपणा करीत असल्याचा आरोप रिपाई पदाधिकारी पाटोळे यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या