Wednesday, April 24, 2024
HomeनगरVideo Story : निर्बंधाना व्यापारी व कामगारांचा विरोध

Video Story : निर्बंधाना व्यापारी व कामगारांचा विरोध

अहमदनगर | प्रतिनिधी

राज्य सरकारने केलेल्या मिनी लॉकडाऊनला नगर शहरातील व्यापारी व कामगारांनी बंद दुकानासमोर उभे राहून विरोध दर्शविला. तर या निर्णयाचा निषेध नोंदवून सोमवार ते शुक्रवार सर्व नियमांचे पालन करुन व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली.

- Advertisement -

मागील वर्षी झालेल्या टाळेबंदीमुळे व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हळहळू अर्थचक्र रुळावर येत असताना पुन्हा मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली लॉकडाऊनच करण्यात आले आहे.

(व्हिडिओ स्टोरी – अर्जुन राजपुरे)

शहरातील कापड बाजार, मोची गल्ली ही मुख्य बाजारपेठ आहे. यामध्ये विविध दुकाने असून, हजारो कामगार आपला उदरनिर्वाह करीत आहे. राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तू वगळून सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इतर दुकानातील व्यापार्यांचा दिवाळा निघणार आहे. तर या दुकानात काम करणारे हजारो कामगारांचा रोजगार हिरावला जाणार आहे. करोनाची साखळी बाजारपेठा बंद करुन तुटणार आहे का? हा प्रश्न उपस्थित करुन यामुळे मोठ्या प्रमाणात अर्थचक्र बिघडणार असल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्यक्त केली. तर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7 वाजेपर्यंत व्यापार्यांना नियमांचे पालन करुन आपला व्यवसाय करु देण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या