Video : रोगापेक्षा इलाज भयंकर; ‘पाहा’ स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल काय म्हणताय शिवसैनिक?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोना रुग्णसंख्या (Corona) अत्यंत कमी झाली असून हळूहळू बाजारपेठ सुरू होत आहे. यामुळे सणांच्या पार्श्वभूमीवर तरी शहरातील दहीपूलसह परिसरात सुरू असलेली स्मार्ट सिटीची (Smart City) कामे लवकर पूर्ण होणे अपेक्षीत होते. मात्र तसे झाले नाही. मनपा आयुक्तांची भेट घेऊन कामे त्वरीत पूर्ण करण्याची मागणी करण्यात येणार आहे. कामे मार्गी न लागल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन (Agitation) करुन स्मार्ट सिटी कंपनीला वठणीवर आणणार अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने घेण्यात आली आहे.

आज (दि. 26) सकाळी माजी महापौर विनायक पांडे (Vinayak Pande) यांच्या पुढाकाराने त्यांच्या घरी शिवसेना पदाधिकार्‍यांनी बैठक घेतली. त्यानंतर बंद पडलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांची पाहणी करण्यात आली. यावेळी माजी महापौर वसंत गिते (Vasant Gite), विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते, ॲड. यतीन वाघ, माजी स्थायी सभापती संजय चव्हाण, माजी नगरसेवक नैय्या खैरे, सचिन बांडे, संदेश फुले आदी उपस्थित होते.

स्मार्ट सिटी कंपनीचा गोंधळी कामाचा फटका नाशिककरांना सतत बसत आहे. विशेष करुन दहीपुल, कानडे मारुती लेन, मेनरोड अशा शहरातील मुख्य बाजार पेठ भागातील व्यापार्‍यांना बसत आहे. वेळोवेळी तक्रारी करुनही येथील कामे मार्गी लागत नाही. म्हणून शिवसेनेच्या शिष्टमंडळाने या परिसराची व्यापार्‍यांसह पाहणी करुन आढावा घेतला...

Related Stories

No stories found.