Video : 'शिवसेना' नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्ह शिंदेकडे गेल्यानंतर नाशिकचे पदाधिकारी प्रभू श्रीराम चरणी लीन

Video : 'शिवसेना' नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्ह शिंदेकडे गेल्यानंतर नाशिकचे पदाधिकारी प्रभू श्रीराम चरणी लीन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

काल निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्षाचे नाव एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्यात आले आहे...

आज नाशिकमधील शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. काळाराम मंदिराचे विश्वस्थ महंत सुधीर पुजारी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी काळाराम मंदिरात आरती केली.

यावेळी खासदार हेमंत गोडसे, अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे, राजू लवटे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नाशिक महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, प्रभू रामचंद्रांचे जे धनुष्यबाण आहे ते धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला मिळाले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

बाळासाहेबांचे जे विचार होते ते विचार सोडून काही लोक काम करत होते. त्यामुळे निवडणूक आयोगाचा जो काही निर्णय झाला तो सर्व शिवसैनिकांना अभिप्रेतच होता. या निर्णयामुळे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते खुश आहेत. तसेच काळाराम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांना अशी विंनती केली की, बाळासाहेब ठाकरेंचे जे हिंदुत्वाचे विचार आहेत ते विचार पुढे घेऊन जाण्यासाठी पक्षाला व कार्यकर्त्यांना आशीर्वाद लाभो असे त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com