Video : बंदुकीचा धाक दाखवत जबरी दरोडा; 28 तोळे सोन्यासह 17 लाख 34 हजारांचा ऐवज लंपास

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथील रतन शिवाजी बोडके यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून 28 तोळे सोने व साडे आठ लाख रुपये रोख रक्कम असे एकुण 17 लाख 34 हजारांचा ऐवजांचा धाडसी दरोडा टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ढकांबे येथे आशेवाडी रस्त्यावरील गट नंबर 40/3 मध्ये रतन शिवाजी बोडके यांच्या मालकीची शिवकमल नावाची दोन मजली इमारत आहे. रात्री दिड ते तीन वाजेच्या सुमारास 35 ते 40 वयोगटातील 6 सहा दरोडोखरांनी बंगल्यात प्रवेश केला.

बंदुकीचा धाक दाखवत दमदाटी केली. यावेळी 28 तोळे सोने, साडे आठ लाख रुपये रोख रक्कम असे एकुण 17 लाख 34 हजार 400 रुपयाचा इतका ऐवज घेवून रतन बोडके यांच्या मालकीच्या क्रेटा कारमध्ये बसून फरार झाले. ढकांबे फाट्यावरील वाडा हॉटेलजवळ कार लावलेली असल्याचे आढळून आली आहे.

घटनेची माहिती समजताच पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, उपअधिक्षक माधुरी कांगणे, कळवण उपविभागीय अधिकारी भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी श्‍वान पथकाला पाचारण करुन दरोडोखोरांचा मार्ग बघण्यात आला. यावेळी अधिक तपास पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, उपअधिक्षक माधुरी कांगणे, कळवण उपविभागीय अधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरीचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस उपनिरीक्षक अरुण आव्हाड आदी दिंडोरी पोलिस करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com