Video : सिलिंडरचे दर वाढल्याने नाशिकच्या महिला भडकल्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकः पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलासोबतच (Petrol) आता गॅस सिलिंडरचे (Gas) दर गगनाला भिडल्यानं सामान्यांची कोंडी झाली आहे. (Inflation) ऑइल कंपन्यांनी 1 सप्टेंबरपासून स्वयंपाकाच्या गॅसचे दर तब्बल 25 रुपयांनी वाढवलेत....

यामुळं नाशकात (Nashik) स्वयंपाकाच्या गॅसचे दर तब्बल 888.50 रुपयांवर गेले आहेत. विशेष म्हणजे गेल्या आठ महिन्यांत गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये 190 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे नाशिकमधील महिलांनी संताप व्यक्त केला.

नाशिकमधील महिला म्हणतात...

१) असे कसे सरकार आहे, सामान्यांनी जगायचे कसे

२) आता चुलीवरच स्वयंपाक करायचा का?

३) पुर्वी रॉकेल मिळत होते आता रॉकेलही बंद केले?

४)परत पुर्वीचे दिवस आले, हातावर काम असणाऱ्यांना सिलिंडर परवडत नाही.

५) फ्लॅटमध्येच चुल पेटवावी लागणार?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com