
वाशिम | Washim
वाशिममधून काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर आला आहे. एक चार वर्षांची चिमुकली खेळत असताना इमारतीवरुन तिचा तोल गेला. तरीही ती या घटनेतून सुदैवाने बचावली आहे. या घटनेचा चमत्कारिक व्हिडीओ समोर आला आहे....
ही घटना वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरातील महानंदा कॉलनीत घडल्याची माहिती मिळत आहे. चार वर्षांची चिमुकली घराच्या गॅलरीत खेळत होती. यावेळी तिचा तोल जाऊन ती जवळपास 30 फुटाच्या उंचीवरून खाली कोसळली.
खाली उभ्या असलेल्या एका बाईकच्या सीटवर ती पडली. त्यामुळे तिला कुठलीही इजा झाली नाही. तब्बल ३० फुटांच्या उंचीवरुन पडूनही ती चिमुकली सुदैवाने सुखरूप आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.