Video : गोदातीर पूर्वपदावर, व्यवहार सुरळीत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकमधील यंदाच्या हंगामातील पहिला पूर (Flood in Nashik) ओसरला आहे. धरण क्षेत्रातील पावसाची संततधार थांबल्याने रात्रीतून अनेक धरणातील विसर्ग कमी करण्यात आला. त्यामुळे गोदातीर पुन्हा एकदा पूर्वपदावर आला आहे. व्यावसायिकांनी आपली दुकाने हलविण्यास सुरुवात केली आहे.

तसेच आज गोदाघाटावर धार्मिक विधीदेखील पार पडले आहेत. पाण्याची पातळी कमी झाल्याने मुलांनी रामकुंडात डुबक्या मारल्या. अनेकांनी आपली वाहने नदीच्या पाण्यात धुण्यासाठी आणल्याचे दिसून आले. दरवर्षी पूर ओसरल्यानंतर गोदातीरी मोठ्या प्रमाणात कचरा, गाळ साचतो, परंतु यंदा मात्र गोदातीरी स्वच्छ असल्याचे पाहायला मिळाले. पाहा व्हिडिओ...

Related Stories

No stories found.