Video : पौष्टिक खायचंय, तर बळीराजालाही आधार हवाच...! नैसर्गिक शेतीत 'त्यांनी' घेतली आंतरपिके

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिन्नर तालुक्यातील पाडळी या गावात एका शेतकऱ्याने आंतरपिके घेत एकाच वेळी ५ ते ६ पिकांची लागवड केली आहे. सर्व पिके केमिकल विरहित असल्याने त्यांच्या जमिनीचा पोतही वाढत आहे. पाडळी गावातील ज्ञानेश्वर रेवगडे यांनी आपल्या शेतात कारले, दोडके, गिलके, कणस, वांगी अशी अनेक पिके त्यांनी घेतलेली आहेत. पारंपारिक पध्दतील फाटा देत त्यांनी आपल्या शेतात वेगवेगळ्या पिकांची लागवड केली आहे...

यावेळी ज्ञानेश्वर म्हणाले की, नाशिक, पुणे, मुंबई, अहमदाबाद, सुरत, अहमदाबाद, दिल्ली या भागात विक्रीसाठी जातो. आम्ही नाशिकमध्ये स्वतःचा माल उभारला आहे. शेतकऱ्यांकडून हा माल ३२ रुपयांनी खरेदी केला जातो. वर्षभरासाठी हा भाव एकच असतो. भावात कुठलीही चढ उतार होत नाही.

मार्केटची सध्याची अवस्था काय?

मार्केटच्या परिस्थितीबाबत हितेश पटेल म्हणतात, शेतकऱ्याला हमीभाव देण्याचे काम आम्ही करत आहे. सध्याची मार्केटची परिस्थिती अशी की, शेतकरी मार्केटला गेल्यानंतरच त्याला रोजच्या दराची माहिती मिळत असते. भाव दररोज कमी जास्त होत असतात. नैसर्गिक शेतीत खर्च कमी आहे. उत्त्पन्नदेखील चांगले मिळत आहे. मात्र ग्राहकांमध्ये अजूनही जनजागृती होणे आवश्यक आहे.

बाहेरील मार्केटमध्ये भाव कमी झाला की ग्राहक आमच्याकडून माल घेत नाही, ग्राहकाला हे लक्षात येत नाही की, आमच्या केमिकल विरहित भाज्या खाल्ल्याने त्याला कुठलाही त्रास होणार नाही. अन्य केमिकलयुक्त भाज्यांपेक्षा आमच्या भाज्या तुलनेने उत्तम आहेत. हे ग्राहकाला समजणे आवश्यक आहे,

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com