Monday, April 29, 2024
HomeनाशिकVideo : नाशिकमध्ये ईद उत्साहात साजरी; चाळीस हजार मुस्लिम बांधवांचे सामुदायिक नमाज...

Video : नाशिकमध्ये ईद उत्साहात साजरी; चाळीस हजार मुस्लिम बांधवांचे सामुदायिक नमाज पठण

जुने नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज ईद-उल-फित्रचा मोठा सण मुस्लिम समाजाने मोठ्या उत्साहात, पारंपारिक पद्धतीने तसेच शांततेत साजरा केला. ईद-उल-फित्रचा मुख्य सोहळा ऐतिहासिक शहाजानी ईदगाह मैदानावर आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास झाला. यावेळी शहर परिसरातील सुमारे 40 हजार मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण केले.

- Advertisement -

Sinnar : तालुका कृषी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले

यावेळी देशासह नाशिकच्या प्रगतीसाठी तसेच शांतता अबाधित राहण्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. मुस्लिम बांधवांना ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर खा. हेमंत गोडसे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी महापौर दशरथ पाटील, विनायक पांडे, वसंत गीते, माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे, माजी नगरसेवक गुलजार कोकणी, गजानन शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक कृउबा निवडणूक : आमदाराला धमकी; चुंभळे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल

ईदची नमाज झाल्यावर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गोरगरिबांना दानधर्म केले तसेच बडी दर्गा शरीफसह शहरातील विविध कब्रस्तान मध्ये जाऊन विशेष प्रार्थना करीत पुष्प अर्पण केले.

अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

- Advertisment -

ताज्या बातम्या