Video : मालेगावातील शेवगा पोहोचतोय परदेशात; पाहा देशदूतचा खास Ground Report

नाशिक | Nashik

जिल्ह्यात कांदा, डाळिंब, द्राक्ष यांसारखी नगदी पिके (Crops) प्रामुख्याने घेतली जातात. मात्र, काही शेतकरी (Farmer) यापेक्षा वेगळा विचार करत आपल्या शेतात नवीन प्रयोग यशस्वी करतात. त्यातून शेती व्यवसायाला अधिकाधिक किफायतशीर करण्याकडे प्रयोगशील शेतकऱ्यांचा कल असतो.

असाच एक वेगळा प्रयोग मालेगाव तालुक्यातील (Malegaon taluka) जळगाव (Jalgaon) येथील रमेश आहिरे यांनी आपल्या शेतात यशस्वी केला असून त्यांनी शेवग्याची शेती (Drumstick Farming) अत्यंत यशस्वीपणे फुलवली आहे. त्यांच्या शेतातील शेवगा परदेशी बाजारात विर्क्रीसाठी निर्यात केला जातो.

याबाबत माहिती देतांना आहिरे यांनी सांगितले की, शेवगा हे पिक अत्यंत संवेदनशील असल्यामुळे त्याची योग्य काळजी घ्यावी लागते. त्यावरील फवारणी करतांना योग्य प्रमाण वापरावे लागते.

तसेच फुल आणि फळांची (Fruits) जोपासना होण्यासाठी खतांच्या नियोजनाबरोबरच मधमाश्यांचे व्यवस्थापन देखील करावे लागते. याशिवाय शेवग्याला योग्य भाव मिळाला तर ही शेती परवडते अन्यथा परवड नाही असे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com