Video : "५० टक्के, महिला ओक्के"; चित्रा वाघ नाशिक ते मालेगाव एसटीने प्रवास करतात तेव्हा...

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आज नाशिक ते मालेगाव एसटी बसमधून (ST Bus) प्रवास केला. त्यांनी राज्य शासनाने एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिटात 50 टक्के सवलत दिल्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रवास केला आहे. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाहा व्हिडीओ...

नुकताच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महिलांना एसटी बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली. त्या अनुषंगाने १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ आज दि. १८ मार्च रोजी भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी घेतला, या योजनेच्या माध्यमातून महिलांना मोठा उपयोग होणार असल्याने पन्नास टक्के, महिला ओक्के अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

वाघ यांचा मालेगाव (Malegaon) येथे मेळावा असल्याने या मेळाव्यासाठी त्या अनेक महिलांसोबत एसटीच्या माध्यमातून रवाना झाल्या. यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, शिंदे फडणवीस सरकारचे आभार त्यांनी राज्यभरातील महिलांसाठी विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेष अशी योजना सुरू केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Video : "५० टक्के, महिला ओक्के"; चित्रा वाघ नाशिक ते मालेगाव एसटीने प्रवास करतात तेव्हा...
Nashik : ...तर आज राजकीय चित्र वेगळं असतं; नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

राज्यभरातील महिलांसाठी ही फायदा होणार आहे. 50 टक्के एसटी भाड्यामध्ये सूट मिळणार आहे. पहिल्यांदा राज्यातील महिलांचा कुणीतरी विचार केला सगळ्याच एसटी प्रवासातून महिलांना सरसकट सूट देण्यात आली आहे. 'पन्नास टक्के, महिला ओक्के', अशी घोषणा देत त्यांनी सरकारचे आभार मानले. त्यांच्या या घोषणेची मोठी चर्चा होत असून त्यांच्या प्रवासाचे व्हीडीओ आणि फोटो समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com