Video : शेतकरी संघर्ष संघटना करणार 'यज्ञयाग'; आंदोलनाची धार होणार तीव्र

निफाड | प्रतिनिधी | Niphad

तेरा दिवसांपासून शेतकरी संघर्ष संघटनेच्या नेतृत्वाखाली निफाड तहसील कार्यालयासमोर जिल्हा बँकेने सुरू केलेल्या सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात धरणे आंदोलन सुरू आहे....

आंदोलन काळात सत्ताधारी पक्षातील एकही लोकप्रतिनिधी अथवा मंत्री फिरकला नाही. अधिकारी वर्गानेही अद्याप आंदोलकांची भेट घेतली नाही.

प्रशासनाकडून तत्काळ लेखी आश्वासन दिले नाही तर मंगळवारी (दि.‌१८) सकाळी अकराच्या सुमारास रास्तारोको, तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्र्यांना प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी (दि.‌ २१) यज्ञयाग करणार असल्याची घोषणा आंदोलकांनी केली.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com