Video : …अखेर 30 तासांच्या प्रतीक्षेनंतर बछडे मादीच्या कुशीत

jalgaon-digital
3 Min Read

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

तालुक्यातील मर्‍हळ येथे ऊसाच्या शेतात दोन बछडे आढळून आले, मात्र वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी माय-लेकरांची ताटातूट न होऊ देता मानव वन्यजीव संरक्षक विभाग व इको एको फाऊंडेशनच्या सहकार्यातून दोन्ही बछड्यांना मादीच्या कुशीत पोहोचवले. अखेर 30 तासाच्या प्रतिक्षेनंतर बछडे मादीच्या कुशीत विसावले आहेत…

मर्‍हळ येथे पांगरी-मर्‍हळ शिव रस्त्यालगत प्रदीप एकनाथ आढाव, यांची शेतजमीन गट नं. 29 असून त्यामध्ये मंगळवारी (दि.14) ऊसाची तोड सूरू असताना सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास उसाच्या शेतात बिबट्याचे दोन 8 ते 10 दिवसांचे नवजात बछडे आढळले.

मादी जवळपास असावी या भितीने उसतोड मजुरांनी काम थांबवत शेताच्या बाहेर पळ काढला. घटनेची माहिती आढाव यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून दोन बछडे आढळून आल्याची माहिती दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

माहिती मिळताच उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा जाधव, वनपरिमंडळ अधिकारी अनिल साळवे, वनपाल चंद्रमणी तांबे, नारायण वैद्य, यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना मोठा दिलासा; जामीन मंजूर

जवळपास मादीचा कानोसा घेत अलगद त्या दोन बछड्यांना उचलून एका कॅरेटमध्ये ठेवले व त्यांना दूध पाजले. त्यानंतर काही अंतरावर मोबाईलचे कॅमेरे ऑनकरुन कर्मचारी बसले. यादरम्यान, इको फाऊंडेशन व मानव वन्यजीव संरक्षण विभागाचे वैभव भोगले, नरेश चांडक देखील घटनास्थळी पोहचले.

रोजच्या वादातून प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल, प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह…

सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास मादीने कॅरेटमध्ये ठेवलेल्या दोन बछड्यांपैकी एकाला उचलून नेले. दुसर्‍या बछड्यालाही घेऊन जाईल या आशेवर वनविभागाचे पथक रात्री 1.30 वाजेपर्यंत घटनास्थळी थांबून होते मात्र तोपर्यंत मादीने दुसरा बछडा नेला नाही. त्यामुळे वनकर्मचार्‍यांनी इको फाऊंडेशन व मानव वन्यजीव संरक्षक विभागाच्या सहकार्याने परिसरात ट्रॅप कॅेमेरे लावले व परतीचा मार्ग धरला.

दरम्यान, काल (दि.15) सकाळी पुन्हा वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली असता जैसे थे परिस्थिती असल्याने पथकाने या बछड्याला घेऊन नांदूरशिंगोटे येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले. तेथे या बछड्याला दूध पाजले तसेच खायला दिले.

SSC HSC Exam : दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी, वेळेत झाला मोठा बदल

सायंकाळी 5.30 वाजता पुन्हा घटनास्थळी जाऊन बछड्याला कॅरेटमध्ये ठेवले. त्यानंतर 15 मिनिटांनी मादी आली व दुसर्‍या बछड्याला घेऊन गेली. दोन्ही बछडे माईच्या कुशीत विसावल्याचे पाहून वनकर्मचारी खुशीत परतले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *