Video : अबब! 'हा' कालवा की कचरा कुंडी

Video : अबब! 'हा' कालवा की कचरा कुंडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पेठरोड (Peth Road), दत्तनगर (Datta Nagar) जवळील कॅनॉलमधील पाणी अक्षरशः सडले असून त्यावर मधमाशांच्या मोहळाप्रमाणे डासांचे थवेच्या थवे दिसत आहेत...

प्रशासनाने गोदावरी नदीला (Godavari River) पाणी न सोडता ते पाणी या कॅनॉलला मोठ्या प्रमाणावर सोडले तरच या दुर्गंधीयुक्त पाण्याचा बिमोड होईल अन्यथा नाशिककर जनतेला मोठ्या रोगराईला सामोरे जावे लागेल.

तथापी नाशिक महानगरपालिका, पाटबंधारे विभाग यांनी याची गंभीरपणे दखल घ्यावी व हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा असे निवेदन भाजप सरचिटणीस सुनील केदार (Sunil Kedar) यांनी दिले आहे. वास्तविक नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) आरोग्य विभागाच्या ही बाब लगेच लक्षात यायला पाहिजे होती.

अगोदरच नाशिक शहरात (Nashik City) विविध प्रकारचे साथीचे आजार बळावले आहेत. त्यात भरीस भर म्हणजे या कॅनॉलमध्ये सडलेले पाणी आहे. या कॅनॉल रोडच्या आजूबाजूला पुढे मखमलाबाद शिवारापर्यंत पहाटे पुरुष व स्रिया फिरायला जातात. त्यांनाही या दुर्गंधीचा खुप त्रास होत आहे.

तसेच यामुळे नाशिक शहरात साथीच्या रोगांचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे या कॅनॉलच्या स्वच्छतेची खबरदारी घ्यावी व त्वरित या कॅनॉलला मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे तसेच या कॅनॉलच्या आजूबाजूला त्वरित स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी केदार यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com