Sunday, April 28, 2024
HomeजळगावVideo हतनुर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

Video हतनुर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

जळगाव – jalgaon

जिल्ह्यातील हतनुर धरणाचे पाणलोट क्षेत्रात मध्यप्रदेश (Madhya Pradesh) येथे मोठ्या प्रमाणात पाऊस (rain) सुरू असून हतनुर धरणाचे (dam) सर्व 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आलेले आहेत.

- Advertisement -

धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील रावेर मुक्ताईनगर तालुक्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. धरणाखालील भुसावळ, यावल, चोपडा, अंमळनेर, जळगाव, जामनेर, एरंडोल, धरणगाव या सर्व तालुक्यातील नदीकाठच्या गावांनाही सतर्क राहणे बाबत कळविण्यात आलेले आहे.

हतनुर धरणाची धोका पातळी 215 मीटर असून आज रोजी धरणाची पातळी 212 मीटरवर सुरू आहे. तसेच सर्व तहसीलदार व पोलीस विभागास नदीकाठच्या गावी सतर्क राहणे बाबत कळविण्यात आलेले आहे तसेच पोलीस विभागास विभागाकडे असलेल्या बोटी तसेच पट्टीचे पोहणारे, नावाडी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथक आपला मित्र पथक यांना नदीच्या गावी त तत्पर राहणे बाबत कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या