Video : लसीकरण हा सर्वात महत्वाचा उपाय : जिल्हाधिकारी

Video : लसीकरण हा सर्वात महत्वाचा उपाय : जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी सुरज मांढरे

नाशिक । Nashik

लसीकरणाच्या कार्यक्रमात कुठलाही खंड पडणार नाही. त्यासाठी नागरिकांनी लसीकरणात सहभाग होण गरजेचे आहे. त्यामुळे लसीकरण हे एक प्रकारचे संरक्षण आहे. अशा दुहेरी संरक्षणामुळे आपण यातून बाहेर पडू याची मला खात्री आहे, असे मत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले.

दरम्यान विविध संघटनांनी एकत्र येत नाशकात जनता कर्फ्यू पाळला. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नाशिककरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी व्यापारी संघटनांचे आभार मानले. ते यावेळी म्हणाले कि, सध्या आपल्यावर सामाजिक संकट ओढवले आहे. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमाचे योग्यरीत्या पालन करणार आहोत.

प्रत्येकजण सध्या आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहे. तसेच जे कोणी आजारी पडत असतील त्यांना चांगली वैद्यकीय सुविधा प्रशासनाकडून करण्यात येईल. तसेच ऑक्सिजनची उपलब्धता, औषधांची उपलब्धता योग्य प्रकारे करणे आणि जरी या गोष्टीचा तुटवडा होत असल्यास तरी त्यातल्या त्यात योग्य व्यक्तीपर्यंत ही मदत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू, असेही ते म्हणाले.

तसेच शहरातील आयएमए व हॉस्पिटल असोसिएशन असेल यांना देखील आपण सोबत घेत आहोत. त्याचबरोबर आपल्या हातात तिसर हत्यार आहे ते म्हणजे लसीकरण. लसीकरण हा यावरचा सर्वात महत्वाचा उपाय आहे. आपण यापूर्वीच शासनाला कळवले होते कि एका वेळी वीस लाख लोकांना लसीकरण करू इच्छितो.

त्यानुसार आपल्याला लसीचा पुरवठा होत आहे. यापूर्वी सहा लाख १९ हजार लसींचा पुरवठा आपल्याला झाला आहे. त्यापैकी साडे पाच लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. रोज साधारण सतरा ते अठरा हजार लोकांचे लसीकरण होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com