Video : ओझर, जऊळके परिसरात गारांचा पाऊस

Video : ओझर, जऊळके परिसरात गारांचा पाऊस

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील ओझर, आडगावसह जऊळके परिसरात आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून वाढलेल्या तापमानानंतर आज अचानक सायंकाळी आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

गेली दोन तपमानाने या हंगामातील उच्चांक गाठत ३९.५ अंशांचा आकडा पार केला होता. मात्र, आज दीड अंशांनी नाशिक जिल्ह्यात तपमान कमी झाले होते. तरीदेखील उष्णतेमुळे हैराण झालेल्या नाशिककरांची काहीशी सुटका सायंकाळच्या वातावरणामुळे झाली.

जऊळके, आडगाव परीसरात गारपीट

ओझर आडगाव सह जऊळके गावात गारपीट झाली असून अनेक रस्त्यावर तसेच घरांच्या अंगणात गारांचा खच झालेला होता. सगळीकडे लॉकडाऊन असताना अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या तसेच रुग्णांच्या नातलगांची आजच्या अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली.

(जऊळके येथील व्हिडिओ : रितेश गांगुर्डे, जऊळके)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com