Video : चिंचखेडला गारपीटीसह अवकाळी पाऊस; द्राक्ष, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान
नाशिक | Nashik
जिल्ह्यातील पिंपळगाव आणि सिन्नर (Pimpalgaon and Sinnar) या भागांत आज दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशातच दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड (Chinchkhed) येथे आज गारपीटीसह जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
चिंचखेड येथील काही शेतकऱ्यांनी (Farmers) शेतात कांदा काढून ठेवला आहे. मात्र, आज अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे काढून ठेवलेला कांदा (Onion) खराब होण्याची शक्यता आहे. तर काही शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेचे खुडे चालू असून अशा शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान (Damage) होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, चिंचखेड येथे मागील काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळेस देखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यातच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून ठोस नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच वेळेवर पंचनामे (Panchnama) होत नसल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.