श्रावण विशेष : उमा-महेश्वर जागृत देवस्थान
व्हिडिओ स्टोरी

श्रावण विशेष : उमा-महेश्वर जागृत देवस्थान

करोनामुळे भाविकांचा हिरमोड

Rajendra Patil

जळगाव - Jalgaon

शहरापासून १४ किमी अंतरावर जळगाव-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या उमाळे गावाच्या प्रथमदर्शनी भागास उमा-महेश्वराचे आकर्षक शिवमंदीर आहे. महाशिवरात्री व श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार निमित्त याठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.

महाशिवरात्री असो वा श्रावणी सोमवार यानिमित्त खान्देशातील सर्वच महादेव मंदिरात शिवभक्त मंदिरात जाऊन भक्तीभावे दर्शन घेत असतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे सर्वकाही बंद असल्याने भाविक मंदिर दर्शनापासून वंचीत राहीले. तरी सुध्दा काही भावीक याठिकाणी येऊन बाहेरून दर्शन घेऊन परत जाताना दिसत आहेत.

मंदिराचे वैशिष्ट्य : उमा म्हणजे माता पार्वती व महेश्वर म्हणजेच भगवान शंकर असा अर्थ काढला जातो. याठिकाणी वैशिष्ट्यपुर्ण आकाराची पिंड आहे. हे क्षेत्र जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. मंदिर परिसरात मोठे वडाचे वृक्ष आहेत. या मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला असल्याने व देखभालीसाठी विश्वस्त मंडळ स्थापन केल्याने मंदिरासह परिसराची देखभाल केली जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com