Video पुरामूळे नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प

नंदूरबार जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूर, चार किलोमीटर वाहनांच्या रांगा
Video पुरामूळे नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प

नंदूरबार l प्रतिनिधी nandurbar

नवापूर तालुक्यातील (Navapur taluka) विसरवाडी (Visarwadi) गावाजवळील पुल पाण्याखाली गेल्याने नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील (Nagpur-Surat National Highway) वाहतूक ठप्प (Traffic jams) झाली असून तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

दरम्यान वाहतूक वळवण्यात आली आहे. नंदूरबार जिल्ह्यातील गेल्या तीन दिवसांपासून पावसाची धुंवाधार बॅटिंग सुरू असल्याने जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे. दरम्यान नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावा जवळ पुलाचे काम सुरू होते त्या ठिकाणी मोठा पुर आल्याने पर्यायी पुल पाण्याखाली गेल्याने

नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नवापूर तालुक्यात काल रात्री पासून पावसाची सतत धार सुरू असल्याने नेसू, सरपणी, नागण नद्यांना पूर आला आहे.

वाहतूक अजून काही तास खोडांबळण्याची शक्यता असल्याने नंदूरबार व उच्छल मार्ग वाहतूक वळविण्यात आल्याचे विसर वाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com