Video : चिखल झालेल्या टोमॅटोची कसरत; व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही

Video : चिखल झालेल्या टोमॅटोची कसरत; व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही

नाशिक | प्रतिनिधी Nashik

एककडे टोमॅटोचा (Tomato) चिखल झालेला असताना शेतकऱ्यांना किती कष्ट करून टोमॅटो बाजारापर्यंत न्यावा लागतो आहे याचे एक उदाहरण नुकतेच सिन्नर तालुक्यात घडलेल्या एका प्रसंगावरून समोर येते आहे.... (Accident at Duberewadi sinner)

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या डुबेरवाडी येथील शेतकऱ्याच्या शेतातील टोमॅटोचे कॅरेट घेवून जाणारी पीक अप शेतातून मार्ग काढत मार्केटच्या दिशेने जात असताना अचानकच एका उंचवट्यावर बोनेटसह पिकअप पुढच्या बाजूने उचलली गेली. सुदैवाने वाहन उचलले गेल्यानंतर एकाच ठिकाणी स्थिर राहिल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले नाही.

सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही वा कुठल्याही मालाची नुकसान शेतकऱ्याची या घटनेत झाली नाही. दोन तासाचा हा थरार शेतकरी वर्गाने अनुभवला. टोमॅटोचे सुमारे दोनशे कॅरेट घेऊन मालवाहतूक करणारी पिक अप शेतातून मुख्य रस्त्यावर आणत असतांना ही घटना घडली आहे.

रस्त्याने जाणाऱ्या व आसपासच्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आणून तरंगणारी पिक अप अलगद खाली आणली. मात्र, गावभर या घटनेची चर्चा झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com