Video : भाव कोसळल्याने शेतकऱ्याने उभे कापले टोमॅटोचे पिक

म्हेळुस्के | वार्ताहर Mheluske

भाजीपाल्याचे दर (Vegetables rate down in nashik) कोसळले आहेत तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने आश्वासक असणाऱ्या टोमॅटोचाही चिखल झाल्यामुळे (Tomato) निराश झालेल्या शेतकऱ्याने टोमॅटो पिक कापून टाकले आहे. उभे पिक कापून टाकावे लागल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत....

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हेळुस्के येथील युवा शेतकरी अनिल धुमने यांनी आपल्या मालकीच्या शेतात जवळपास एक एकर टोमॅटो पिकाची लागवड केलेली आहे. त्यात प्रामुख्याने टोमॅटोची रोपे, मल्चिंग पेपर, तार, बांबु, सुतळी, लागवड खर्च, बांधणी खर्च, खते-औषधे असा जवळपास 70 ते 80हजार रुपयांचा खर्च त्यांनी केला होता.

बाजारपेठेत मात्र टोमॅटो पिकाला कवडीमोल भाव मिळत असून झालेला खर्च देखील वसूल होईल की नाही याची शाश्वती राहीलेली नसल्याने या शेतकऱ्याने आपल्या हाताने टोमॅटो पिक कापून टाकले.

अगोदरच उसनवारी करून टोमॅटो पिकाची लागवड केलेली असतांना यापुढेही फवारणी, तोडणी खर्च, वाहतूक खर्च यासर्व बाबींचा विचार करून 50 ते 60 रु.दर मिळत असेल तर तो उत्पादन खर्चाच्या तुलनेत न परवडणारा आहे.

डोक्यावर कर्जाचा बोजा आहे त्यात आणखी उसनवारी करून हा बोजा वाढवून घेऊन भविष्यात आत्महत्या करण्यापेक्षा आजच हा कटू निर्णय घेणे योग्य राहील अशा भावना आपला संताप व्यक्त करतांना अनिल धुमने यांनी मांडल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com