Video : दैव बलवत्तर! तिसऱ्या मजल्यावरून पडूनही तीन वर्षीय चिमुकला सुखरूप

Video : दैव बलवत्तर! तिसऱ्या मजल्यावरून पडूनही तीन वर्षीय चिमुकला सुखरूप

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देव तारी त्याला कोण मारी असेच काही एका तीन वर्षांच्या मुलाबरोबर घडले आहे. ओझर (Ozar) येथील चांदनी चौक (Chandani Chowk) अलसना अपार्टमेंट येथे राहणाऱ्या फेयजान सद्दाम शेख (Faizan Saddam Shaikh) हा तीन वर्षांचा हा मुलगा तिसऱ्या मजल्यावरुन खाली रोडवर पडल्याची घटना घडली आहे...

मात्र दैव बलवत्तर म्हणून फेयजान सुखरूप वाचला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ओझरमधील अलसना या अपार्टमेंटमध्ये शेख कुटुंब तिसऱ्या मजल्यावर राहते. फेयजान आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये खेळत होता. यावेळी त्याची आई घरात काम करत होती.

खेळता खेळता बाल्कनीच्या ग्रीलमधून तो खाली पडला. फेयजान तिसऱ्या मजल्यावरुन चांदणी चौकच्या रस्त्यावरती पडला. घटना घडल्यावर तात्काळ त्याला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले.

त्याला कुठेही इजा न झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एवढ्या उंचीवरुन पडूनदेखील फेयजानला दुखापत झाली नसल्याने डॉक्टरांनीदेखील याबाबत आश्चर्य व्यक्त केले. पाहा व्हिडीओ...

Related Stories

No stories found.